Samata Shakti Mahila Nagri Credit Cooperative Society
About
SSMCCS समताशक्ती महिला नागरी सहकारी पतसंस्था, बीड कार्यक्षेत्र: बीड जिल्हा नोंदणी क्रमांक: बी एच आर/बी एच आर/आर एस आर/सी आर/152/2021 स्थापना दिनांक 21.09.2021बीड तालुक्यातील बचत गटातील महिला पतसंस्थेचे काम बीड जिल्हा कार्यक्षेत्रात विस्तारीत व्हावे अशी मागणी इतर तालुक्यातील महिला बचत गट करू लागले त्यातून कोविड नंतर कामाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने समता प्रतिष्ठान ने पुढाकार घेऊन समताशक्ती महिला नागरी सहकारी पतसंस्था, बीड दिनांक 2 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू केली.आज या तीन साडेतीन वर्षात 3671 सभासद असून रू 68.44 लाख भागभांडवल जमा झाले आहे. तर स्थापनेपासून या सभासद महिलांना रू 11.64 कोटीचे कर्ज वितरण करण्यात आले आहे.या पतसंस्थेचे वैशिष्ट्ये:
१. नियमित बचत व नियमित कर्ज वाटप महिला गटातील मासिक बैठकीत केले जाते.
2. उद्योजक, व्यावसायिक व उत्पादक कर्जाला प्राधान्य दिले जाते
3. उद्योजकता प्रशिक्षण
4. अतिरिक्त बचतीसाठी विविध मुदत ठेव योजना.
5. रू १०००० ते रू ५०००० चे सामान्य कर्ज तर रू ५०००० ते रू १५०००० चे उद्योजकता कर्ज किफायतशीर व्याज, सुलभ कर्ज परतफेड मासिक हप्त्यावर उपलब्ध
6. तारणावर नव्हे कारणासाठी कर्ज हे धोरण
7. स्थापनेपासून नफ्यात व ऑडिट अ दर्जा असलेली पतसंस्था
8. प्रशिक्षित व महिला कर्मचारी वर्ग
9. वार्षिक सभा आणि इतर सामाजिक उपक्रम यातून सभासद महिलांचा सहभाग
10. सभासद महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण व आर्थिक साक्षरता यासाठी विशेष उपक्रम


