top of page
  • Facebook

समता प्रतिष्ठान - सामाजिक परिवर्तनाची २५ वर्षे

समता प्रतिष्ठान बीड या चळवळीची सुरुवात २००१ मध्ये वर्ल्ड सोशल फोरम, भारत ज्ञान विज्ञान समिती, जन आरोग्य अभियान, अन्नपुर्णा परीवार यापासून प्रेरणा घेत समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक शांतता, स्त्री पुरुष समानता, आर्थिक साक्षरता व साम्यवाद, समाजवाद, धर्म निरपेक्षता ही मूल्ये समाजात रुजावीत व वृध्दींगत व्हावीत यासाठी कऱण्यात आली.या कार्यासाठी बीड मधील आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी आमचे प्रेरणास्थान कॉ. त्र्यंबक हरगंगे (काका) हे सक्रीयपणे उभे होते, आहेत.आज काकांच्या वयाची ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच समताचे काम सुरू केले त्याला देखील २५ वे वर्षे लागत आहे. १९९५ ते २००० या काळात आम्ही BGVS, जन आरोग्य अभियान, लोक प्रतिष्ठान, वर्ल्ड सोशल फोरम या मार्फत विविध सामाजिक, शैक्षणिक, ज्ञान विज्ञान प्रसार असे उपक्रम राबविले. पुढे समताने प्रामुख्याने महिला सक्षमीकरण व स्वावलंबन या विषयावर कार्य करावे असे ठरले त्यातूनच बचत गट व महिला सक्षमीकरणासाठी पॅक्स प्रकल्पा अंतर्गत अन्नपुर्णा महिला मंडळ यांचे मार्फत व डॉ. मेधा सामंत पुरव याच्या मार्गदर्शनाने कार्य सुरू झाले.नंतर महिला सहकारी पतसंस्था मार्फत महिलांसाठी आर्थिक साक्षरता व सक्षमीकरण उपक्रम राबविला सुरू केले यासाठी अन्नपुर्णा महिला मंडळ मार्फत कर्ज उपलब्ध झाले त्यातूनच हे काम वाढत गेले. कोरो साक्षरता समिती मार्फत ग्रासरुट फेलोशिपमधुन महिला कार्यकर्त्यांसाठी स्थानिक नेतृत्व विकास कार्यक्रमामार्फत समताच्या २० महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. तसेच एकल महिला संघटना स्थापनेत देखील समताने सक्रिय सहभाग घेतला आहे.आरोग्य सेवांवरील लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्रियेत समता प्रतिष्ठानचा सहभाग उल्लेखनीय राहिलेला आहे. यातून प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र,आंगणवाडी तसेच गावातून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा व त्यावर लोकांची देखरेख यात समतातील महिलांनी विशेष सहभाग घेतला आहे. यात मानव लोक ही जिल्हा समन्वय संस्था होती तर समता ही बीड तालुका समन्वय संस्था होती.महिलांच्या साक्षरता व वाचन संस्कृती जोपासण्यासाठी समताच्या पुढाकाराने भारतरत्न कॉ. अरुणा आसफ अली सार्वजनिक वाचनालय सुरु करण्यात आले आहे.समता महिला बचत गट सदस्यांची सहकारी पतसंस्था व समताशक्ती महिला सहकारी पतसंस्था मार्फत समताने महिलांमध्ये आर्थिक साक्षरता व स्वावलंबन यासाठी नियमीत बचत व गरजेनुसार वारंवार उपलब्ध होणारे कर्ज यातून समता सभासदांना उद्योग - व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल उपलब्ध झाले आणि आपण आर्थिक विकास करण्यासाठी व्यवसाय करु शकतो हा विश्वास निर्माण झाला.बीड तालुका समता महिला पतसंस्थेला सुरुवातीला अन्नपुर्णाने फ्रेंचायसी स्किममधुन कर्ज पुरवठा उपलब्ध करुन दिला. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने पुढे रू. ५० लाखाचे कॅश क्रेडिट कर्ज उपलब्ध करून दिले. समता सभासदांनी गेल्या पाच वर्षांपासून सर्व कर्ज परतफेड करीत पतसंस्था स्वावलंबी केली आहे. आज रोजी ५००० सभासदाच्या रू ३५०.०० लाख ठेवी असून रु. ३०० लाख कर्ज येणेबाकी आहे.या सर्व कामाचा सकारात्मक परिणाम म्हणजे समताच्या सुमारे ५०० महिला उद्योजक, व्यवसायिक झालेल्या आहेत. त्यातील निवडक व सुमारे तीन वर्षापासून उद्योग व्यवसाय करणाऱ्या ७५ महिलांची माहिती पुस्तिका या कार्यक्रमात प्रकाशित करण्यात येत आहे.या सर्व कामात गेल्या २५ वर्षांत खूप चढउतार पाहिले. अनेक अडीअडचणींवर मात केली कारण कॉ. त्र्यंबक हरगंगे काका दीपस्तंभासारखे समता च्या मागे खंबीरपणे सक्रिय होते. या पार्श्वभूमीवर हा समताशक्ती उद्योजक महिला महामेळावा आयोजित करण्यात येत आहे. तसेच या वर्षी पासून कॉ.त्र्यंबक हरगंगे यांच्या पुढाकाराने आपण पद्मश्री कॉ. प्रेमाताई पुरव महिला उद्योजक पुरस्कार समता परिवारातील सदस्य महिला उद्योजीकेस देण्याचा संकल्प करीत आहोत. यावर्षी हा पुरस्कार आपण दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी देत आहोत तर पुढील वर्षीपासून दरवर्षी ८ मार्च, जागतिक महिला दिनी हा पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे . महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत उद्योजकता व व्यवसायिकता यांचे महत्व आहे. स्वावलंबी व स्वयंपूर्ण होण्यासाठी महिलांनी बचत व कर्ज याच्या पुढे जाऊन स्वत:चे उद्योग, व्यवसाय सुरु केले पाहिजेत ही समता प्रतिष्ठानची व त्याच्या सहयोगी पतसंस्थांची कायम भूमिका राहिली आहे. त्यासाठी समता परिवाराने पुढाकार घेत विविध प्रशिक्षण आयोजित केलेले आहेत. यासाठी नाबार्ड, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा ग्रामोद्योग केंद्र, एम सी ई डी अशा संस्थासोबत ही महिलांची प्रशिक्षणे वारंवार आयोजित केली जातात. महिलांचा सामाजिक, आर्थिक, सांकृतिक, शैक्षणिक, कौटुंबिक, राजकीय स्तरावरील विकास व निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढवायचा असेल तर त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहणे व स्वावलंबी होणे अत्यंत गरजेचे आहे . त्यासाठी समता परिवार सतत प्रयत्नशील आहे. ही जरी ७५ महिलांची यशोगाथा असली तरी यापुढे जाऊन समता परिवार सभासद असलेल्या सुमारे ५०० महिला आपले छोटे मोठे उद्योग, व्यवसाय करीत आहेत व त्यांची व त्यांच्या कुटुंबाची आर्थिकदृष्ट्या उन्नती करीत आहेत. महिलाच्या हातात आर्थिक निर्णय आल्यावर त्याच्या कुटुंबातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी चांगला उपयोग होतो हे दिसून आले आहे. बचत व गुंतवणूक या आर्थिक साक्षरतेतील महत्वाचा टप्पा आता समता परिवारातील महिला सभासदाच्या लक्षात आला आहे. तसेच कोठून कर्ज घ्यावे, कर्जावरील व्याजदर या बाबीची समज निर्माण झाल्यामुळे महिला आपल्या खर्चासाठी सावकाराकडे जायच्या थांबल्या आहेत हे दिसून येत आहे. खर्च कोठे करायचा व कोठे खर्चाला आवर घालायचा याचे एक आत्मभान समता परिवारातील सदस्य महिलांना आलेले आहे . एखाद्या सामाजिक संघटनेने पंचवीस वर्षाचा टप्पा गाठावा हे आजच्या युगात महत्वपूर्ण आहे, सभासदाचा दुर्दम्य विश्वास व आपण समताने हाती घेतलेले कार्य व त्याची सभासदांना असलेली गरज हे यामागचे सूत्र आहे. संघटनेची पुढील वाटचाल अधिक यशस्वी व सभासदांसाठी फलदायी व्हायला हवी यासाठी आपण उद्योजक महिला सभासदाच्या या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करीत आहोत.यावेळी आपण जरी ७५ महिला उद्योजकाची माहिती देत असलो तरी पुढील काही वर्षात दरवर्षी किमान ७५ ते १०० महिलांची माहिती असलेली पुस्तिका आपण नक्की प्रकाशित करू. यंदा आपण ही पुस्तिका छपाई करून प्रकाशित करीत आहोत. यापुढे मात्र आपण डिजिटल फॉर्म मध्ये या पुस्तिका प्रकाशित करूत. या पुस्तिकेसाठी ज्या ज्या महिलांनी त्यांची माहिती दिली व ती फोटोसह प्रकाशित करण्यासाठी संघटनेला परवानगी दिली त्यासाठी संस्था त्याचे आभारी आहे .

image.png

Team

Dedication. Expertise. Passion.

Reg. No. Maha. 244/2001
Trust No. F-9009 (Beed)
Date of Registration: April 2001

bottom of page