Samata Mahila Bachat Gat Members Credit Co-op Society
SMCCS: बीड तालुका समता महिला बचत गट सदस्यांची सहकारी पतसंस्था नोंदणी क्रमांक: बी एच आर/(बी एच आर)/बी एन के/401/2008 दिनांक 29.09.2008 बचत गटातील महिलांसाठी हक्काने, सहज व सुलभ तसेच कमी व्याजाचे व गरजेनुसार कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी तसेच बचत गटातील महिलांनी एकमेकांना आधार व सहकार्य करीत स्वतः ची सहकारी पतसंस्था उभी करावी या उद्देशाने व पॅक्स प्रकल्पातून तयार झालेल्या महिलांच्या अशा व आकांक्षा यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा या विचारातून बीड तालुका महिला बचत गटातील सदस्यांची सहकारी पत संस्था दिनांक 2 ऑक्टोबर २००८ रोजी स्थापन करण्यात आली.७५ बचत गटातील ७५० महिलांनी रू १,५०,००००/ भागभांडवल उभे करून हि पतसंस्था स्थापन केली.या पतसंस्थेचे उद्घाटन डॉ मेधाताई सामंत (पुरव) यांनी केले. बेळगाव येथील कॉ. आनंद मनसे याप्रसंगी प्रमुख पाहुणे होते.अन्नपूर्णा फ्रेंचाईसी स्कीम मार्फत या पतसंस्था क्रेडिट लाईन उपलब्ध करून दिली गेली.पतसंस्थेची वैशिष्ट्ये
१. दरमहा बचत गटातील बैठकीत बचत व कर्ज मंजुरीबाबत निर्णय.
२. बचत गटातील बचतीच्या दहापट कर्ज सभासदांना उपलब्ध
3. गटांच्या मासिक बचतीसोबतच सभासदांना अधिकची बचत करण्याची सुविधा उपलब्ध.
4. बचत गटातील महिलांनी एकमेकांना जमीनदार व्हावे व त्यातून सामूहिक निर्णय घेऊन कर्जवाटप
5. कर्ज वाटप करताना तारणाचा विचार न करता कारणाचा विचार करून कर्ज मंजुरी
6. सावकारी कर्ज काढायचे नाही हि सभासदना पूर्व अट.
7. रू ५००० ते रू ३०००० पर्यंत सामान्य कर्ज तर रू ५०००० ते रू १५०००० पर्यंत उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध.
8. वर्ष २०२५ पर्यंत अन्नपूर्णा कडून रू.३८३.७१ लाखाचे कर्ज मिळाले व ते संस्थेने संपूर्ण व्याजासह परतफेड केले आहे.
9. महाराष्ट्र ग्रामीण बँक मार्फत रू ५० लाखांची कॅश क्रेडिट सुविधा उपलब्ध. ती देखील पतसंस्थेने व्याजासह संपूर्ण परतफेड केली आहे.
10. स्थापनेपासून मार्च २०२५ पर्यंत पतसंस्थे मार्फत रु.१५.६३ कोटी रुपयांचे कर्ज ५५६७ सभासदांना वाटप करण्यात आलेले आहे.


